चंद्रपूर - नारंडा येथील मुरली सिमेंट कंपनीला दालमिया सिमेंट कंपनीने ओव्हरटेक केल्यावर कामगारांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला, याकरिता कामगारांनी अन्यायाविरुद्ध आवाज उचलला मात्र कंपनी प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, मुरली सिमेंट कंपनीचे रूपांतर दालमिया मध्ये झाल्यावर आधीच्या कामगारांना कंपनीने सेवेत सामावून घेतले नाही व ज्यांना कामावर घेतले त्यांना सिमेंट वेज बोर्डनुसार वेतन दिल्या जात नाही.
विशेष म्हणजे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना कामावर न घेता दालमिया प्रबंधनाने झारखंड, उत्तरप्रदेश, बिहार व आसाम वरून कामगार आणले. Mns chandrapur
त्यांना नियमित वेतन वाढवून दिल्या जात आहे मात्र स्थानिकांना डावलण्याचे काम कंपनी प्रशासनाद्वारे केल्या जात आहे. स्थानिक कामगारांनी याविरोधात खासदार, आमदार यांच्याकडे धाव घेत न्याय देण्याची विनंती केली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.
मात्र आमदार व खासदार यांच्या शिफारशी ने त्यांच्या जवळ असलेल्या रोजगार कंपनीत मिळाला, मात्र प्रकल्पग्रस्तांच्या समस्या ऐकण्यासाठी त्यांना वेळ नाही. Mns adhikrut
कामगारांचे म्हणणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष नगरसेवक सचिन भोयर यांनी ऐकत दालमिया कंपनी गेट समोर महाधरणे आंदोलन सुरू केले.
10 ऑक्टोम्बरपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला जवळपास 25 दिवसांचा कालावधी लोटला, मात्र कामगारांच्या मागण्या पूर्ण न करता त्यांच्यावर बळजबरी करीत आंदोलन संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. Mns maharashtra
मनसे जिल्हा उपाध्यक्ष भोयर यांनी आक्रमक पवित्रा घेत न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका घेतली. Dalmia cement
आंदोलनादरम्यान प्रकल्पग्रस्त कामगार संतोष संकुलवार यांनी कंपनीचे एचआर उमेश कोल्हटकर व सिनियर मॅनेजर पराग पानपट्टीवार यांच्या जाचाला कंटाळून कंपनीच्या आवारात विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला.
इतकेच नव्हे तर कंपनीत आवारात या घटनेचे पडसाद पडू नये यासाठी त्या कामगाराला कंपनी आवाराच्या बाहेर काढण्यात आले, मात्र इतर कामगारांनी संकुलवार यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले, सध्या संकुलवार यांची परिस्थिती नाजूक आहे.
कंपनी प्रशासन तुघलकी कारभार करीत असून वारंवार कामगारांवर अन्याय करीत आहे.
जोपर्यंत कामगारांना न्याय मिळणार नाही तो पर्यंत आंदोलन असेच चालू असणार असा इशारा भोयर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे.
