कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील नांदाफाट येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत विजयक्रांती कंत्राटी कामगार संघटनेच्या कामगारांनी मागील 8 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले होते.या कालावधीत अनेक घडामोडी घडल्यानंतर अखेर या आंदोलनाची 18 डिसेंबर रोजी रात्री उशीरा सांगता झाली. Vijay Kranti आंदोलनकर्त्यांच्या 3 प्रमुख मागण्या होत्या.या मागण्या बाबत कंपनीच्या वरिष्ठांनी संघटनेच्या अध्यक्षा शिवानी वडेट्टीवार यांच्या सोबत सकारात्मक टेलीफोनिक चर्चा केली.ह्या मागण्या शुल्लक आहे आणि आम्ही हे करायला तयार आहो अशी माहिती मिळाली व प्राप्त आदेशानुसार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनी प्रशासना सोबत आपल्या स्तरावर चर्चा केली.आपल्या मागण्या वरिष्ठ पातळीवर मंजूर झाले आहे.जे काही मागण्या आहे ते पुर्ण करण्यात येईल,अशा प्रकारे आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.आंदोलनाच्या यशाबद्दल कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पहायला मिळत असून कंपनी प्रशासनाने कामगारांना दिलेल्या आश्वासनाविषयी पुढे काय घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. Kingmaker
