चिमूर - आसरा फाउंडेशनच्या वतीने वृद्धाश्रमात असलेल्या वृद्ध नागरिकांना या गारठ्यात मायेची ऊब मिळावी यासाठी फाउंडेशनच्या अध्यक्षा पायल कापसे यांच्या संकल्पनेतून उबदार शॉल व कंबलचे वितरण करण्यात आले.
आसरा फाउंडेशनची स्थापना सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याच्या उद्देशाने करण्यात आली असून त्यासाठी फाउंडेशनचे सर्व सदस्य आपल्या परीने कार्य करीत आहे. Old age home
सध्या हिवाळा असल्याने राज्यात जोरदार थंडी पडू लागली आहे, यासाठी श्री उज्ज्वल गोरक्षण ट्रस्ट संचालित श्री माहेश्वर वानप्रस्थंश्रम येथील वृद्धांना कडाक्याच्या थंडीपासून बचाव व्हावा यासाठी शॉल व कंबलचे वाटप करण्यात आले.
यावेळी आसरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा पायल कापसे व नागपूर आसरा ग्रुपचे सदस्य उपस्थित होते, वृद्धाश्रमातील वृद्धांनी या उपक्रमाबद्दल आसरा फाउंडेशनचे मनापासून आभार मानले.
