चंद्रपूर - मेजर गेट परिसरात दरवर्षी होणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात Tadoba Road ताडोबा रोडवर महानिर्मिती कंपनीच्या संरक्षक भिंतीमुळे 1 ते दीड फूट पाणी साचून परिसरातील दुकाने,ये-जा करणारी वाहने,आसपास ची घरे यांना पाणी पास न होत असल्याने मोठे नुकसान होत असे. पाणी साचत असल्याने नागरिकांना दुसऱ्या मार्गाने फेरा मारून जावे लागत असे. Bjp Chandrapur
दरवर्षी या होणाऱ्या त्रासामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.याबद्दल येथील दुकानदार तसेच नागरिकांनी कित्येकदा यावर तोडगा काढण्यासाठी मागणी केली.
याची दखल घेत माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार भाजपा नेते रामपाल सिंग यांच्या नेतृत्वात महानिर्मिती कंपनीच्या स्थापत्य विभागाशी हिराई अतिथी गृह येथे काही महिन्या अगोदर बैठक आयोजित केली होती.
याचे फलित म्हणून स्थापत्य विभाग व भाजपा पदाधिकारी यांनी संयुक्तपणे सर्वे करून ही बाब लक्षात आणून दिली.व आज प्रत्यक्ष यावर उपाययोजना म्हणून लोखंडी जाळी बसविण्यात आली.यामुळे दरवषी होणाऱ्या त्रासाला आडा बसणार आहे.
ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याकरिता भाजप नेते श्री.रामपाल सिंग,तालुका अध्यक्ष हनुमान काकडे, माजी जि. प. सदस्य विलास टेंभुरने,शांताराम चौखे, जि. प. सदस्या वनिताताई आसुटकर,पं. स.सभापती केमाताई रायपूरे,ग्राम पंचायत उर्जानगरचे सरपंच, भाजपा ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष नामदेव आसुटकर,युवा मोर्चा तालुका महामंत्री अतुल पोहाने, ग्राम पंचायत सदस्य मदन चिवंडे,संजय गिलबिले, उर्जानगर ग्राम पंचायत सदस्य याच बरोबर स्थापत्य विभागाचे अधिकारी यांचे सहकार्य लाभले.
