प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - मुल तालुक्यातील नव्हे चंद्रपूर जिल्यातील लोकप्रिय मनमिळाऊ स्वभाव असलेला समाज कार्यकर्ता संजय मारकवार हे दिनांक 6 डिसेंबर 2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनीच अनंतात विलीन झाले, निर्वाण झाले आणि संपूर्ण मारकवार कुटुंबीयांवर, राजगड वासीयांवर,मुल तालुक्यातील ग्रामीण जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला ही या परिसरातील सर्व सामान्य जनतेची व शेतकरी बांधवांची एवढेच नव्हे तर कांग्रेस पक्षाची फार मोठी हानी झाली असून एक असामान्य व्यक्तिमत्व हरपले ही हानी कदापिही भरून निघणार नाही. माणसे येतात-जातात पण असे व्यक्तिमत्व फार दुर्मिळ भेटतात संजय भाऊ मारकवार कुटुंबियांचे भूषण होते, मुल तालुक्याचेही भूषण होते, अतिशय मनमिळाऊ,कुटुंब वत्सल,समाज वत्सल,माणसे जोडणारा लोकप्रिय, सच्चा समाजसेवक संजय भाऊत कर्तृत्व,नेतृत्व,वक्तृत्वाची जणू एक खान होती, कुठलाही भेदभाव नाही, सर्व राजकीय पक्षाला, नेतृत्वाला चालणारा लोकप्रिय ग्रामीण नेता, आणि अन्यायाला वाचा फोडणारा तळमळीचा कार्यकर्ता होता. म्हणूनच अल्पावधीत त्यांनी अनेकविध पदे भूषविली होते, मुल पंचायत समितीचे सदस्य, उपसभापती,नंतर सभापती व दुसऱ्यांदा परत सदस्य, आणि Agricultural Produce Market Committee कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक, आदर्श ग्राम राजगड येथील सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक व संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष ,चंद्रपूर जिल्हा कांग्रेसचे महासचिव, माँ. दुर्गा मंदिर समितीचे उपाध्यक्ष, ओबीसी चळवळ समन्वय समितीचे मार्गदर्शक होते. मारकवार कुटुंबियांच्या सहवासात आणि जिवलग मित्रांच्या मार्गदर्शनात आपल्या शेती व्यवसाया सोबतच कंत्राटचा व्यवसायमधून कुटुंबाची प्रगती साधली. सामाजिक,शक्षणिक,सांस्कृतिक, कार्यात नेहमी अग्रेसर असायचे, शेतकाऱ्यांविषयी तळमळ असल्यामुळे धार्मिक भावनेतून विरइ येथे महायज्ञाचे आयोजनही केले होते. शेतकऱ्यांसाठी,सुशिक्षित बेरोजगारांसाठी आंदोलन पुकारले, रुग्णालय,पोलीस स्टेशन,तहसील कार्यालय,बँक, अशी अनेक कामे व सेवा केली. तालुक्यातील जनतेच्या सुखात- दुःखात आवर्जून सहभागी राहत नागरिकांच्या मुला-मुलींच्या लग्न कार्यात सुद्धा त्यांचा पुढाकार राहायचा म्हणून आजही त्यांची लोकप्रियता कायम आहे. असे निगर्वी व्यक्तिमत्व हरपले असा विश्वासही बसत नाही. परंतु नियतीला ते मान्य नव्हते, म्हणताना जो आवडतो सर्वाला- तोची आवडे देवाला गोकुळा सारख्या घरातून, निघून गेले हेच सत्य मानून ईश्वर आपल्या आत्म्यास सदगती, चिरशांती प्रदान करो अशी प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्य आपल्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन मारकवार कुटुंबियांकडून व त्यांच्या क्षेत्रातील चाहत्याकडून भावपुर्ण श्रद्धांजली.🙏🏻🙏🏻🙏🏻शांती..शांती..शांती... 🙏🏻🙏🏻 शोकाकुल - गुरु गुरनुले