कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
विदर्भाचा स्वतंत्र राज्य मिळवून नवीन व युवा पिढीच्या स्वाधीन करणं हीच रामाभाऊंना खरी श्रद्धांजली ठरेल.असे प्रतिपादन राजूरा विधानसभेचे माजी आमदार,विदर्भवादी नेते अॕड.वामनराव चटप यांनी केले.ते शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष व विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गडचांदूर येथील स्व.भाऊराव पाटील चटप आश्रय शाळा येथे शेतकरी संघटनेचे माजी प्रांतीय अध्यक्ष,विदर्भ आंदोलन समितीचे समन्वयक,विदर्भ राज्य पार्टीचे संस्थापक स्वर्गीय रामभाऊ नेवले यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. Independent vidarbha
यावेळी जि.प.माजी सभापती नीलकंठराव कोरांगे,माजी जि.प.सदस्य विलास धांडे,शेतकरी संघटना कोरपना तालुका माजी अध्यक्ष प्रवीण सावकार गुंडावार,गणपत काळे,डॉ.बोबडे,नागोबा गोवारदिपे,संतोष पटकोटवार,राजूरा न.प.चे नगरसेवक मधुकर चिंचोलकर इत्यादिंची मंचावर उपस्थिती होती. यानिमित्ताने उपस्थित मान्यवरांनी स्व.राम नेवले यांच्या आठवणींना उजाळा दिला तसेच आगामी विविध स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर श्रध्दांजली कार्यक्रमाला विदर्भ आंदोलन समिती,स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्यासंख्यने उपस्थिती होती.संचालन व प्रास्ताविक प्रा.रत्नाकर चटप यांनी तर आभार संतोष पटकोटवार यांनी व्यक्त केले.