प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - महाराष्ट्र शासनाने Covid 19 कोविड-19 संबंधी ग्राहकाने मार्कस न लावल्यास दुकानदार मालकास 10 हजार रुपये दंडाची कारवाई करण्याची तरतूद केली आहे. परंतु दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्याच्या पूर्वी दुकानदार, business man व्यापारी,उद्योजक यांचेशी किंवा त्यांच्या संघटनेशी असोसिएशनशी चर्चा करायला पाहिजे होती त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते, त्यांनीही सुचविलेल्या सूचना काही प्रमाणात गृहीत धरायला पाहिजे असे जर केले असते तर व्यावसायिक, उद्योजक सुद्धा नाराज झाले नसते. म्हणून शासनाने केलेली कारवाई एकतर्फी,अन्यायकारक असल्याची भावना व्यावसायिक बंधूंची झाली आहे. करिता ही कारवाई स्थगित करुन व्यवसायीकांसोबत,उद्योजकांसोबत त्यांच्या प्रतिनिधी सोबत चर्चा करुन, त्यांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घ्यावा या मागणीसाठी मूल जी. चंद्रपूर येथील जनरल व्यापारी असोसिएशन च्या वतीने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नाम.उद्धवजी ठाकरे यांचेकडे तहसीलदार यांचे मार्फतीने ऐका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. मागील दोन वर्षात कोविड-19 च्या परिस्थितीत व्यवसायीकांचेही व उद्योजकांचे दुकानाचे सेंटर बंद होते. तरी देखील दुकानात काम करणाऱ्या नौकरांचे कुटुंब उघड्यावर उपाशी राहू नये म्हणून त्यांचा ठरलेला पगार द्यावाच लागला. एकंदरीत दुकानदारांना व उद्योजकांना माल विक्री केल्याची एकही आवक झाली नसतांना सुद्धा काम करणाऱ्यांचा पगार भरून द्यावा लागला. त्यामुळे मागील दोन वर्षात व्यावसायिक देखील कर्ज बाजारी होऊन त्यांनाही आत्महत्या करण्याची पाळी आली. अशा परिस्थितीत व्यावसायिक अजूनही सावरला नाही. त्यासाठी ही दंडात्मक कारवाई थांबवावी अशी मागणी मुल जनरल व्यापारी एसोसिएशन तर्फे करण्यात आले आहे. याप्रसंगी तहसीलदार यांना निवेदन देतांना अध्यक्ष मोती टहलीयांनी ,संजय चिंतावार, सचिव संजय ऐरोजवार, किशोर सुत्रपवार व सदस्य उपस्थित होते. निवेदनाच्या प्रति जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.विजय वडेट्टीवार, आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी न.प.मुल यांनाही देण्यात आले आहे.