चंद्रपूर - जागतिक एड्स दिनानिमित्त, All India Para Medical and Vocational Training Center ऑल इंडिया पॅरा मेडिकल आणि व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर चंद्रपूरचे मुख्य संचालक रोशन पाटील आणि आदित्य मलिक यांच्या हस्ते एड्स जनजागृती रॅलीला हिरवी झेंडी दाखवुन रैली काढण्यात आली.
ही रॅली विविध मार्गांवरून चंद्रपूर, सामान्य रुग्णालय येथे संपली. त्यानंतर बॅनर पोस्टरसह एड्स जनजागृती चे संदेश देण्यात आला, याशिवाय या शाळांमधील विद्यार्थ्यांकडून पथनाट्याद्वारे एड्स जनजागृती करण्यात आली.
एड्स टाळण्यासाठी सावधगिरी, जनजागृती आणि माहिती हाच पर्याय असल्याचे संचालक रोशन पाटील यांनी सांगितले. एड्सचे विषाणू मानवी शरीरात प्रवेश करून प्रतिकारशक्ती कमकुवत करतात, असे मार्गदर्शन समारोप सभेत करण्यात आले. World AIDS Day
जागतिक एड्स दिनानिमित्त ऑल इंडिया पॅरा मेडिकल व व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरच्या शिक्षक पल्लवी रायपुरे रेश्मा सय्यद, जिनत आती, रोहित कांबडे आदींनी अथक परिश्रम घेतले.