प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर dr. Babasaheb Ambedkar यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य मुल तालुका व शहर आणि Mahila Congress महिला कांग्रेस कमेटीतर्फे कांग्रेस नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते बाबासाहेब यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. तसेच उपस्थित कांग्रेसचे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व पदाधिकारी यांनीही प्रतिमेला मालार्पण करुन अभिवादन केले. प्रसंगी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, उपसभापती संदीप कारमवार, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा संचालक राकेश रत्नावार,तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक अखिल गांगरेड्डीवार, संचालक राजेंद्र कन्नमवार, महिला कांग्रेसच्या अध्यक्ष रुपाली संतोषवार, नगसरसेविका लिनाताई फुलझेले, ओबीसी सेलचे अध्यक्ष गुरुदास चौधरी, माजी सरपंच सुमित आरेकर, राजू पाटील मारकवार, हसन वाढई,व युवक कांग्रेसचे अध्यक्ष पवन निलमवार, शहर कांग्रेस अध्यक्ष सुनील शेरकी, ग्रामीण कांग्रेसचे गणेश खोब्रागडे, प्रदीप कामडे, सुरेश फुलझेले, चंद्रकांत चतारे, यांचेसह शहर व तालुका कांग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.