चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील वडगाव येथे भव्य निःशुल्क आरोग्य शिबीराचे आयोजन भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी चंद्रपूर महानगर व रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी तथा किसन विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. Health Camp
आरोग्य शिबीराच्या उद्घघाटन कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते त्यांनी यावेळी सांगितले की आरोग्य शिबीर हे सामान्य नागरिकांची सेवा करण्याचे उत्तम माध्यम असून व आरोग्य विषयक समस्या स्थानिक पातळीवर सोडविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सदर आरोग्य शिबीराचे यशस्वी आयोजन करणाऱ्या मध्ये भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ.किरण देशपांडे, भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर उपाध्यक्षा डॉ.भारती दुधानी,रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीचे सचिव अमोल पोटुडे यांनी योग्य नियोजन करून आरोग्य रोगनिदान शिबीराचा कार्यक्रम यशस्वी केला.
सदर कार्यक्रमात रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा विद्या बांगडे,डॉ.प्रमोद बांगडे, भाजपा महानगर कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, पश्चिम मंडळ अध्यक्ष रवी लोणकर,संदीप देशपांडे,किरण बुटले,पूनम गरडवा,इंद्रामनी पांडे,किरण चिन्न्ना,अजय दुधानी, सुरेश गोरशेट्टीवार,विनय कुलकर्णी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तर विविध क्षेत्रातील नामवंत डॉक्टरांनी नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या जाणून घेतल्या व त्यावर उपचार सांगितला त्यामध्ये डॉ.प्रवीण पंत,डॉ.अमित मुरके,डॉ.रफिक मवानी, डॉ.प्रमोद राऊत,डॉ.प्रवीण घोडे,डॉ.सचिन सरदेशपांडे, स्त्रीरोगतज्ञ डॉ.कीर्ती साने,डॉ.ऋचा पोडे, तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी गायत्री गरडवा,स्मिता उमरे,पूनम तामगाडगे,प्रिया येरने, स्वर्णलता गज्जला यांची उपस्थिती होती