चंद्रपूर - दिनांक 4 डिसेंबर 2021 ला माजी मंत्री तथा आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार दिनांक 02 डिसेंबर गुरुवारला Cstps महाऔष्णिक विद्युत केंद्रातील उर्जानगर वसाहतीत झालेल्या वाघाच्या हल्ल्याबाबत तात्काळ बंदोबस्त करण्यासंबंधी वनविभागाला निवेदन देण्यात आले.
महाऔष्णिक विद्युत केंद्रातील उर्जानगर वसाहतीमध्ये दिनांक 02 डिसेंबर गुरुवारला सायंकाळच्या वेळी हिराई अतिथी गृहाजवळ वसाहतीमधील कर्मचारी श्री.रुपेश पंजाबराव लांडे वय 38 वर्षे यांच्यावर पट्टेदार वाघाने जोरदार हल्ला करून सदर इसमास गंभीररीत्या जखमी केले.सदर व्यक्तीचा शहरातील कुबेर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे. Animals
उर्जानगर वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा वावर असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिसरात tiger वाघ, leopard बिबट, अस्वल,या सारख्या हिंस्त्र प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने येथील कामगार वर्गाला जीव मुठीत घेऊन दिवस रात्र कामावर जावे लागते.
याच वसाहतीमध्ये 1 वर्षांपूर्वी 6 वर्षाच्या मुलीचा बिबट्याने बळी घेतला. Bjp Chandrapur
अश्या हिंसात्मक घटनावर आडा आणण्याकरिता भारतीय जनता पार्टी चंद्रपूर तालुक्याच्या वतीने भाजपा नेते रामपाल सिंग यांच्या नेतृत्वात मुख्य वनसंरक्षक श्री.एन.आर. प्रवीण यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
यावेळी तालुका अध्यक्ष हनुमान काकडे यांच्यासह माजी जि. प. सदस्य विलास टेंभुर्ने,भाजपा ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष नामदेव आसुटकर,भाजयुमो तालुका महामंत्री अतुल पोहाने, उर्जानगर ग्रा.पं.सदस्य मदन चिवंडे,भाजपा कार्यकर्ता दीपक मडावी,नंदूभाऊ इंगळे इत्यादी कार्यकर्त्याची उपस्थिती होती.
यावेळी त्यांनी वनविभागमार्फत लवकरात लवकर योग्य उपाय योजना करण्यासंबंधी आश्वासन दिले.
