प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मुल तालुक्यातील मौजा सिंतला येथील अल्पभूधारक शेतकरी अतुल वैरागडे हे अनेक दिवसांपासून दुर्धर आजाराने त्रस्त असून त्यांना उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज लक्षात घेऊन cdcc bank chandrapur चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारी एकमेव बँक आहे. बँकेचे अध्यक्ष कांग्रेसचे नेते तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांच्या हाती बँकेचे सूत्रं आल्या बरोबर बँकेच्या विकासाच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी बँकेला मिळालेल्या आर्थिक नफ्यातून धोरणात्मक बदल करून शेतकऱ्यांना हार्ट, कँसर सारखे दुर्धर आजार झाले असता तात्काळ उपचारासाठी आर्थिक मदत दिली जात आहे. आणि बँकेच्या मदतीने अनेक रुग्ण बरे झाले आहेत. मुल तालुक्यातील मौजा सिंतला येथील दुर्धर आजाराने त्रस्त असलेला युवक शेतकरी अतुल वैरागडे यांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन रुग्णाला बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी तीस हजार रुपयांचा आर्थिक मदतीचा चेक दिला.
याप्रसंगी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनशाम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा संचालक राकेश रत्नावार, सामाजिक कार्यकर्ते गुरु गुरनुले, सिंतला ग्रामस्थ जनार्धन भुरसे, मधुकर बुरांडे, अंबादास चलाख,मिलिंद सातपुते, मारोती वासेकर, यांचेसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी सिंतला गावात यापूर्वीही कॅन्सरग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत करुन सहकार्याबद्दल उपस्थित गावकऱ्यांनी संतोषसिंह रावत यांचे आभार मानले.
