घुघुस - 2015 ला चंद्रपूर जिल्हा दारूबंदी घोषित झाल्यावर अनेकांनी अवैध दारू तस्करी व गांजा तस्करी सुरू केली होती, मात्र 2021 ला जिल्ह्याची दारूबंदी उठल्यावर आजही अवैध धंदे जोमात सुरू आहे.cannabis
सध्या गांजा विक्री साठी घुघुस शहर मुख्य केंद्र म्हणून अस्तित्वात आले आहे, शहरात अनेक ठिकाणी 50 ते 100 रुपयात गांजाची पुडी सहज उपलब्ध होत आहे.
घुघुस शहर हे औद्योगिक शहर म्हणून प्रचलित आहे, कोल वॉशरी व कोल ट्रान्सपोर्ट हा शहरातील मुख्य व्यवसाय आहे, प्रदूषणाच्या बाबतीत शहर अव्वल स्थानी आहे. Ghughus
आजपर्यंत गांजा विक्री ही बाहेरून आलेले व्यक्ती करीत होते पण सध्या शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या अवैध व्यवसायात उतरले आहे.
सध्या गांजा विक्री केंद्र बैंक ऑफ इंडिया पूल के जवळ, बहादे लेआउट, रेल्वेसायडिंग, गांधीनगर, अमराई, ओड़ियाई मोहल्ला, एसीसी रोड माता मंदिर के जवळ, स्नेहप्रभा मंगल कार्यालय च्या मागे, जिल्हा परिषद शाळेजवळ,पंचशील चौक, उर्दू स्कूल वस्ती जवळ, इंदिरानगर ओल्ड B टाइप, नकोड़ा बाजार वार्ड, बंगाली कैम्प भागात गांजा सर्रास पद्धतीने विकल्या जात आहे. Crime news
बँक ऑफ इंडिया येथील पुलाजवळ अवैध कोळसा, दारू व गांजा तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे, पोलिसांनी याबाबत तपास केल्यास शहरातील गांजा तस्करीवर आळा बसेल.
सध्या गांजा घेणाऱ्यामध्ये अल्पवयीन बालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.
