कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार गुरुवारी सदाशिवनगर बंगळुरू येथे घडला.तेथील काही समाजकंटकांनी महाराजांच्या पुतळ्यावर काळा रंग टाकून पुतळ्याची विटंबना केल्याने महाराष्ट्रातील शिवप्रेमींमध्ये नाराजी असून संतापाची लाट उसळली आहे.याच पार्श्वभूमीवर गडचांदूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत असून अशाप्रकारे भावना दुखावणारे कृत्य कदापि सहन केले जाणार नाही अशी भावना व्यक्त करत तीव्र शब्दात याचा निषेध उपस्थित शिवप्रेमी राकाँ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.यावेळी नगरपरिषद उपाध्यक्ष तथा कोरपना राकाँ तालुकाध्यक्ष शरद जोगी,मयुर एकरे,करण सिंह,प्रवीण मेश्राम, अभिषेक तुराणकर इत्यादी राकाँ कार्यकर्त्यांची प्रमुखाने उपस्थिती होती. Chatrapati shivaji maharaj statue
