चंद्रपूर - ‘दिव्याखाली अंधार’ ही म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय जर बघायचा असेल तर चंद्रपूरच्या स्थानिक आमदाराचे कार्यकर्तृत्व बघा. स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्याने केलेल्या कामावर गालबोट लावून सुपर प्रसिद्धीसाठी आंदोलनाचे उद्योग सुरु केले आहेत. त्यामुळे मनपाच्या कामावर घोटाळ्याच्या आरोप लावताना आधी आपल्या "दिव्याखालचा अंधार" बघा आणि मगच दुसऱ्याला "फाईव्ह स्टार" देण्याची भाषा करा, अशी सणसणीत प्रतिउत्तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
चंद्रपूर शहर स्वच्छ राखण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी रात्रदिवस मेहनत घेत आहेत. नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता कर्मचारी झटतो आहे. नागरिकांच्या सहकाऱ्याने आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या श्रमातून चंद्रपूर शहराला केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या 'स्वच्छ अमृत महोत्सवा'मध्ये थ्री स्टार देऊन सन्मान करण्यात आला. Chandrapur municipal corporation
अशावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौतुक आणि नागरिकांचे अभिनंदन करण्याऐजवी स्थानिक आमदार मात्र स्वतःला सुपरस्टार सिद्ध करण्यात लागले आहेत.
केवळ, आगामी महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्थानिक आमदाराची यंग चांदा ब्रिगेड गुडघ्याला बाशिंग बांधून उभी आहे. मनपातील सत्ताधाऱ्यांना उपरोधिक फाईव्ह स्टार" देऊन स्वतःची फजिती करून घेण्यापेक्षा आमदाराने निवडणूक काळात दिलेले आश्वासन बघावे. त्यातील किती पूर्ण झाले, त्याची यादी जाहीर करावी. दिलेले आश्वासन जर पूर्ण केले असतील तर याच गांधी चौकात ९ डिसेंबर रोजी त्यांचा "सेव्हन स्टार" पुरस्कार देऊन सन्मानित करू. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या ५ वर्षाच्या कार्यकाळात कोणताही घोटाळा झाला नाही. तसे कोणतेही पुरावे नाहीत. विकासकामांना जर घोटाळे म्हणणार असाल तर, आश्वासन न पाळणाऱ्या आमदारांना "पळपुटे" म्हणायचे काय?
चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे शहरातील प्रत्येक नागरिकाला पाणी मिळेल. शहरातील तुकूम, शास्त्रीनगर, बंगाली कॅम्प, नेताजी नगर बाबुपेठ, बाबुपेठ हायवे, महाकाली, रेव्हेनी कॉलनी, वडगाव आदी ८ पाण्याच्या टाकीचे बांधकाम आता पूर्णत्वास जात आहे. या योजनेतील टाक्यावर झोननिहाय शहरात एकूण १६ पाणीपुरवठा होणार आहे. आज तुकूम, बाबुपेठ, महाकाली येथील पाण्याच्या टाकीतून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.
महात्मा गांधी मार्गावर अगदी शहराच्या हृदयस्थळी आझाद बगिचा आहे. या बगिचात दररोज हजारो नागरिक येतात. पहाटेपासूनच नागरिकांची या बागेत वर्दळ सुरू होते. सायंकाळीही नागरिक मोकळ्या हवेत फिरायला या बागेत येतात. विशेष म्हणजे, वयोवृध्द व बालगोपालही या बागेत येतात. त्यासाठी आझाद बागेचे सौंदर्यीकरण करून बालगोपाल, वयस्क, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा आणि फिरण्याची व्यवस्था केली जात आहे. काही ठिकाणी हिरवळ, प्रवेशद्वार, खेळणे आणि बसण्यासाठी आसने लावण्यात येत आहेत. कोणतेही सुसज्ज आणि चिरकाल टिकणारे काम घाईने होत नाही. येत्या काळात हा बगीचा डोळ्यांचे पारणे फेडेल, यात शंका नाही. Mla kishor jorgewar
कोरोनासारखी भीषण स्थिती असतानाही चंद्रपूर शहर महापालिकेने विकासाकडे दुर्लक्ष केले नाही. आरोग्यासाठी सुरुवातीपासूनच विविध उपाययोजना करण्यात आल्या. नागरिकांना जेवणाचे डब्बे पोहचवण्यात आले. गरिबांना अन्नधान्याची किट वाटप करण्यात आली. दिव्यांग व्यक्तींच्या खात्यात ७५० रुपये दिलेत. बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी विलगीकरण व्यवस्था उभारली. याशिवाय स्थलांतरित मजुरांसाठी राहण्याची व जेवण व्यवस्था केली. हे पुण्यकर्म असतानाही विरोधक त्यात घोटाळे शोधत फिरत आहेत. Young chanda brigade
प्रत्येक आर्थिक वर्ष संपल्यानंतर राज्य शासनाव्दारे स्थानिक निधी लेखा परीक्षण संचालनालयामार्फत (लोकल फंड ऑडिट) लेखा परीक्षण केले जाते. त्यात काही प्रशासकीय त्रुटी आढळल्या. म्हणजे त्यात घोटाळा झाला, अशी ओरड करणे म्हणजे अज्ञानच म्हणावे. आधी महानगरपालिकेतील कामाचा अभ्यास करावा आणि त्यानंतरच पुरस्कार प्रदान सोहळे आयोजित करावेत, अशीही टीका भाजपने केली आहे.
अकरा स्टार पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील एकमेव अपक्ष (?) आमदार
- आमदार म्हणुन कोरोना काळात राज्यशासनाकडून भरघोस मदत व कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी भरघोस निशुल्क कोविड सेंटर सुरु केल्याबद्दल थ्री स्टार
- टीव्हीवर सर्व पक्ष दिसूनही अपक्ष असल्याचा आव आणल्याबद्दल फाइव्हस्टार
- चंद्रपुर विधानसभा क्षेत्रातील नागरीकांना 200 युनिट विज मोफत मिळवून दिल्या बद्दल सेव्हन स्टार
- चंद्रपुर शहराचे प्रदुषण कमी करुन पर्यावरण निर्मिती केल्याबद्दल नाईन स्टार
- आमदार म्हणुन निवडून आल्यापासुन असंख्य बेरोजगारांना रोजगार दिल्याबद्दल इलेव्हन स्टार
- आमदार झाल्यानंतर राज्य शासनाकडून करोडो रुपयांचा निधी शहराला उपलब्ध करुन दिल्याबद्दल सुपरस्टार
- आमदार बनून गावभर फिरुन नुसतीच चमकोगिरी केल्याबद्दल फिल्मस्टार
- पवित्र पोर्टल हे अपवित्र आहे म्हणणारे आपण आमदार झाल्यावर सभागृहात प्रश्न उपस्थित केल्याबद्दल परीक्षार्थ्यांकडून अभिनंदन
- जनतेमध्ये जावून जनतेच्या समक्ष खोटे बोला; पण रेटून बोला, या तत्वाचा पुरस्कार केल्याबद्दल आपले चंद्रपुर नगरवासियांकडून जाहीर अभिनंदन
- आरोग्य भरती परीक्षा घोटाळा बद्दल आपण भरघोस प्रतिक्रिया देवून बेरोजगारांच्या पाठीशी उभे राहील्याबद्दल जाहीर अभिनंदन
स्वत:ची जवाबदारी झटकून महानगरपालिकेकडूनच अपेक्षा करणा-या आमदार साहेबांचा प्रतिकात्मक जाहीर सत्कार- कुठल्याही पुराव्याविना आरोप व स्वत:ची खोटी प्रसिध्दी करण्याकरिता तथा राजकीय स्वार्थ जोपासण्याकरीता स्टंटबाज "पुरस्कार प्रदान सोहळा" आयोजित केल्याबद्दल ब्रिगेडचे विशेष अभिनंदन... असेच करत रहा...!
- आमदार म्हणुन आपली हीच कामगिरी...!