प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल- शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हक्काची बँक म्हणुन ओडखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ऐन शेतीच्या हंगामात मुल तालुक्यातील मौजा कांतापेठ येथील शेतकरी यांच्या गाईला Tiger Attack वाघाने हल्ला करुन मारल्याने कांतापेठ येथील शेतकरी श्री. अमोल बाबुराव भेंडारे व श्री. संजय ऋषी मोहूर्ले या दोनही शेतकऱ्यांना प्रत्येकी (१००००/-) दहा हजार रुपये CDCC बँकेच्या शेतकरी कल्याण निधीमधून देण्यात आले. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी प्रत्यक्ष दोन्ही शेतकऱ्यांच्या घरी जाऊन चेक द्वारे आर्थिक मदत दिली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते किशोर घडसे, हसन वाढई, गुरु गुरनुले, राजू वाढई, चिरोली बँकेचे शाखा व्यवस्थापक अनिल सिरस्कर, अशोक कोडापे, साईनाथ गावतुरे, प्रकाश भेंडारे, विठ्ठल लेनगुरे गुरुदास मोहूर्ले यांचेसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. गरीब व निराधार शेतकऱ्यांना CDCC बँकेने आधार दिल्याने कांतापेठ येथील गावकऱ्यांनी अध्यक्ष संतोषसिंह रावत व बँकेचे संचालक यांचे आभार मानले आहे.