चंद्रपूर - वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे " या संत तुकारामांच्या प्रसिध्द पंक्ती आहेत. एकुण भुभागाच्या ३३ टक्के वने असणे पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक आहे. मात्र, महाराष्ट्र राज्यात हे प्रमाण २१ टक्के पर्यंत खाली आले आहे. पर्यावरण ऱ्हास, भुस्खलन, अकाळी होणारा पाऊस, दुष्काळ, महापुर ही सर्व संकटे निसर्ग निर्मित नसुन मानव निर्मित आहेत. Chandrapur police
पर्यावरणाचा हा ऱ्हास थांबवीण्याकरीता व पुन्हा एकदा ही वसुंधरा हरीत करण्याकरीता दि. ०५ / १२ / २०२० ला पोलीस विभागा तर्फे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात भव्य वृक्ष लागवड करण्यात आली. “ वृक्ष हेच आदय दैवत" हा संदेश प्रत्येक नागरीकांपर्यंत पोहचावा या उद्देशाने पोलीस फुटबॉल, ग्राऊंड पोलीस मुख्यालय कवायत मैदान, पोलीस लाईन व पोलीस स्टेशन मध्ये १००० वृक्ष एकाच वेळेस पोलीस प्रशासना तर्फे लागवड करण्यात आले. त्यामध्ये कडुनिंब, कवट, सिसम, पिंपळ, सप्तपर्णी, गुलमोहर, सिसव, वड, बेहडा, करजी अशा विविध वृक्षांचा समावेश करण्यात आला. Tree plantation
वृक्षरोपण कार्यक्रमाला पोलीस अधिक्षक चंद्रपुर अरविंद साळवे यांच्या सह अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच कार्यक्रमामध्ये सामाजीक संस्था रक्षण धरणी मातेचे फांउडेशन चंद्रपुर हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.