घुग्घुस - 6 नोव्हेम्बरला घुग्घुस शहरालगत असलेल्या महाकाली नगरी येथे राहणारे प्रमोद चरणदास उपाध्ये हे भाऊबीजेकरिता घराला कुलुप लावून बाहेरगावी गेले असता अज्ञातांनी घरातील कुलुप तोडत आत प्रवेश केला व आलमारीत असलेली रोख रक्कम 28 हजार रुपये चोरून नेले. burglary
उपाध्ये परत आले असता घरातील सामान अस्तव्यस्त परिस्थितीत असल्याने त्यांनी याबाबत घुघुस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.
सदर प्रकरणात तब्बल 1 महिन्यानंतर 6 डिसेंम्बरला पोलीस गस्त दरम्यान 2 युवक संशयित रित्या मिळाले पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत विचारपूर केली असता त्यांनी घरफोडी केली असल्याचे कबूल केले.
पोलिसांनी आरोपी कडून 6 हजार 500 रुपये रोख व 2 लोखंडी रॉड जप्त केले.
आरोपीमध्ये 22 वर्षीय प्रवीण सुरेंद्र मेश्राम व देवेंद्र महादेव गेडाम दोघेही राहणारे दुर्गापूर यांचा समावेश आहे.
सदरील यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे, मनोज धकाते, रणजित भुरसे, रवी वाभीटकर, सचिन वासाडे, नितीन मराठे यांनी पार पाडली.