चंद्रपूर :-- चंद्रपूर शहरातील रमाबाई नगर परिसरात 35 वर्षीय महिलेच्या हत्येने एकच खळबळ उडाली.
रमाबाई नगर परिसरातील झरपट नदीच्या काठावर एका महिलेचा मृतदेह नागरिकांना आढळल्याने त्यांनी याची माहिती रामनगर पोलिसांना दिली. Murder in chandrapur
घटनास्थळी पोहचत पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता सदर महिलेचे नाव मना मनोज कोठार असून त्या महिलेला 3 मूल आहे, मात्र गेल्या वर्षभरापासून ती नवरा व मुलांपासून विभक्त राहतेय, तिचा पती बाहेर राज्यात आपल्या मुलांना सोबत घेऊन राहतो.
श्रमिकांची वस्ती असलेल्या या भागात त्या महिलेची हत्या कुणी व का केली? याचा तपास पोलीस करीत आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या महिलेच्या मृतदेहाने अनेक चर्चा परिसरात रंगल्या आहे.
रमाबाई नगर परिसरात सदर हत्या प्रेम संबंधातून झाली असावी अश्या चर्चेला उधाण आले आहे.
सदर महिलेच्या डोक्यात वजनदार वस्तूने प्रहार केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. News34