प्रतिनिधी/रमेश निषाद
चंद्रपुर :- ताडोबा लगतच्या चिचोली, पायली, भटाळी येथील निर्दोष दलित व आदिवासीना अमानुषपणे मारहाण व Electric shock विद्युत शॉक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वनविभागाच्या मुख्य आरोपींवर गंभीर गुन्हा दाखल व्हावा याकरिता सदर प्रकरणाची सखोल High level inquiry उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी व दोषींवर गंभीर गुन्हे दाखल करावे अशी मागणी राजू झोडे व पीडितांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली.
शिकारीच्या संशयावरून वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चिचोली, पायली, भटाळी या गावातील निर्दोष नागरिकांना वनविभागाचे कार्यालय रामबाग या ठिकाणी नेऊन अमानुष मारहाण केली. पीडितांचे कपडे काढून रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. खोट्या गुन्ह्यात अडकवून गुन्हा कबूल करावा म्हणून शरीराच्या नाजूक भागावर विद्युत शाॅक लावण्याचा प्रयत्न केला.
हा अत्याचार करत असताना वनविभागाचे अधिकारी सहाय्यक वनरक्षक निकिता चौरे ही महिला अधिकारी सर्व प्रकार उभी राहून समोर बघत होती. वनविभागाचे कर्मचारी कोणत्या अधिकाराच्या सांगण्यावरून हा सर्व प्रकार करत होते हे संशयास्पद आहे. यामध्ये वनविभागाचे बडे अधिकारी सामील आहेत व यांच्या सांगण्यावरूनच हा अमानुष प्रकार घडलेला आहे. सदर प्रकरण गंभीर असून यामध्ये दलित व आदिवासी पीडितांना अमानुष मारहाण व जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे. Inhuman Assault Case
तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून जे अधिकारी व कर्मचारी दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे याकरिता राजु झोडे, अॅड. फरहत बेग व पीडितांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार दाखल केली.