प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मुल तालुक्यातील राजोली येथील अल्पभूधारक शेतकरी जगदीश खोब्रागडे यांचा १५ वर्षाचा मुलगा पारस जगदीश खोब्रागडे हा ११ व्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुलाला अनेक दिवसांपासून कँसरच्या आजाराने त्रस्त असून त्याच्या उपचारासाठी लाखोंच्या वरच खर्च येत असून त्याचा जीव वाचविण्यासाठी जगदीश खोब्रागडे यांनी घरातील सर्व वस्तू विकून खोब्रागडे कुटुंब हतबल झाला आहे. त्याला आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. याबाबतची माहिती कांग्रेसचे निष्ठावान सक्रिय कार्यकर्ते,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील गुज्जनवार यांनी cdcc bank chandrapur बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना सांगितल्या बरोबर संतोषसिंह रावत यांनी तात्काळ Cancer कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या प्रत्यक्ष घरी जाऊन पारस जगदीश खोब्रागडे याला शेतकरी कल्याण निधीमधून ३० हजार (३०,०००/-) रुपयांचा चेक दिला. आणि स्वतः संतोषसिंह रावत व संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार यांनीही रोख स्वरूपात मदत दिली. याप्रसंगी सुनील गुज्जनवार, सरपंच जितेंद्र लोणारे, उपसरपंच गजानन ठिकरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष शाम पेशट्टीवार, जितू बोनकुलवार, गोपाल पेशट्टीवार, नागोराव सिडाम, श्रीहरी कुलमेथे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते. मदतीची गरज लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारी एकमेव बँक असल्याचे बोलले जात आहे. बँकेचे अध्यक्ष कांग्रेसचे नेते तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांच्या हाती बँकेचे सूत्रं आल्या बरोबर बँकेच्या विकासाच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी बँकेला मिळालेल्या आर्थिक नफ्यातून धोरणात्मक बदल करून शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना कँसर सारखे दुर्धर आजार झाले असता तात्काळ उपचारासाठी आर्थिक मदत देऊन रुग्णाला व त्यांच्या कुटुंबीयांना धीर दील्याबद्दल खोब्रागडे कुटुंबीयांनी व ग्रामपंचायत पदाधिकारी व राजोली वासीय ग्रामस्थांनी संतोषसिंह रावत व बँकेचे आणि समस्त संचालक मंडळांचे आभार मानले आहे. स्व.अशोक पाटील ठिकरे यांच्या कुटुंबियांशी सांत्वनपर भेट राजोली येथील कांग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते स्व.अशोक पाटील ठिकरे यांचे हृदय विकाराने अचानक मृत्यू झाल्याने राजोली येथील कांग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते हरपल्याने त्यांच्या घरी जाऊन संतोषसिंह रावत व राकेश रत्नावार, गुरु गुरनुले, सुनील गुज्जनवार, जितेंद्र लोणारे,गजानन ठिकरे,शाम पेशट्टीवार,गोपाल पेशट्टीवार, जितू बोनकुलवार नागोराव सिडाम इत्यादी कार्यकर्त्यानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.