प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - बल्लारपुर येथील बी. एस. ए. स्पोर्टिंग क्लब चे दोन वॉलीबॉल खेळाडू कोपरगाँव येथे होणाऱ्या वेस्ट झोन state level राज्यस्तरीय वॉलीबॉल स्पर्धेकरिता गोंडवाना विद्यापीठ गढ़चिरोली च्या संघात निवड झाली आहे. महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील कॉमर्स विभागातील कु.प्रेरणा आलोने आणि कु.आस्था ढ़ोंगड़े या दोन्ही खेळडूंनी क्लबचे प्रमुख श्री.प्रमोद आवते, खान सर, श्रीनिवास सर व सर्व वरिष्ठ खेळाडू चे आभार मानले. महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात दररोज Volleyball वॉलीबॉल कोचिंग सुरु असते, वर्षभर सराव करणारे बल्लारपूर येथील बी. एस. ए. हे एकमेव क्लब आहे.
