चंद्रपूर : येथील बालनिरीक्षक गृहातून दोन मुलांनी पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. विविध गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या Juvenile delinquents बालगुन्हेगारांना बालनिरीक्षक गृहात ठेवले जाते. तुकूम येथे बालनिरीक्षण गृह आहे. बुधवार १ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ ते ७ वाजताच्याच दरम्यान, बालगृहातील तीन मुलांनी escape पलायन केले होते. दरम्यान, काही वेळाने एक मुलगा परत आला. मात्र, दोन मुले परत आले नाही. रात्री मुलांच्या चौकशीत दोन मुले पळून गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर येथील रोजंदारी कर्मचारी राजेश मिठ्ठा यांनी रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मरस्कोले करीत आहे. Crime
