चंद्रपूर - देशात सहारा, समृद्धी, मैत्रेय सारख्या दाम दुप्पटीचे आमिष दाखवून जनतेला आकर्षित करण्याचे काम केले, आधी गुंतवणूकदारांना कमिशन एजंट च्या माध्यमातून गुंतवणूक करायला लावणे व कालांतराने पैसे हडप करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणे हा ट्रेंड मागील काही वर्षांपासून सुरू आहे.
इतकं होऊन सुद्धा जनता अश्या आमिषाला बळी पडत आहे, विशेष म्हणजे या आमिषाला सुशिक्षित जनता मोठ्या प्रमाणात बळी पडली. scam
आता पुन्हा चंद्रपुरात Tradewin कंपनीचा महाघोटाळा उघड येण्यासाठी सज्ज आहे, या कंपणीविरोधात सिंदेवाही तालुक्यात गुंतवणूकदारांची तब्बल 2 कोटी 84 लाख रुपयाने फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले, सिंदेवाही पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून कंपनीचे मुख्य शेखर साखरे यांचे विरोधात गुन्हा दाखल केला असून चंद्रपूर जिल्ह्यात या कंपनीत किती नागरिकांनी गुंतवणूक केली आहे याबाबत माहिती घेण्याचे काम आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. Tradewin scam chandrapur
याबाबत नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखा, कार्यालय दुर्गापूर येथे गुंतवणुकीचे कागदपत्रे सोबत घेऊन संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातही या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, आयुष्य भराची कमाई या कंपनीत लावून दाम दुप्पटीच्या आमिषाला अनेकजण बळी पडले, मध्यंतरी कंपनीचे शेखर साखरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांचा सर्व पैसा सुरक्षित आहे असा व्हिडीओ सुद्धा जारी केला होता.
मात्र आता नागरिकांना परतावा मिळत नसल्याने आपली मोठी फसवणूक झाली आहे याकरिता पोलीस विभागाकडे तक्रारी देण्याचे काम सुरू आहे.