प्रतिनिधी/सचिन भटारकर
राजुरा :-- ग्रामपंचायत कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ZP School कळमना येथे भेट देऊन स्वतः विद्यार्थ्यांचा शिकवणी वर्ग घेतला. नंदकिशोर वाढई यांनी स्वतः याच शाळेमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. शाळेला भेट दिली असता त्यांनी आपल्या मनातील शाळेबद्दलच्या प्रेम व आस्थेतून विद्यार्थ्यांचा शिकवणी वर्ग घेण्याचा मोह आवरता आला नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांबरोबर हितगुज करून थेट शिकवणी वर्ग घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारून शाळा, शिक्षक, अभ्यासक्रम, आवड निवड, जीवन ध्येय, विद्यार्थ्यांच्या अडचणी याबाबत चौकशी केली.
या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना बिकट परिस्थितीतही शिक्षण पूर्ण करून आई - वडिलांचे, शाळेचे, गावाचे नाव मोठे करावे तसेच आपल्या आई - वडीलांकडे Rain Water Harvesting System रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम व शोष खड्डा चा वापर करणे, कुटुंबामध्ये कुणीही व्यसनाच्या आहारी न जाणे अशा आग्रह धरण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी सुद्धा सरपंचांना शब्द दिला की या दोन्ही गोष्टी चा आग्रह आम्ही कुटुंबियांकडे नक्की करणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी ग्रामसेवक नारनवरे, शिपाई विठ्ठल नागोसे, शिपाई सुनील मेश्राम व विद्यार्थी उपस्थित होते.