चंद्रपूर - हवा प्रदूषणामुळे Air Pollution चंद्रपूरकरांच्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होत आहे हे दर्शवण्यासाठी मुंबई स्थित वातावरण फाउंडेशन, आणि इको-प्रो Eco-Pro व क्लीन एअर एक्शन ग्रुप चंद्रपूर च्या वतीने श्वास घेणाऱ्या कृत्रिम फुफुसांची सावरकर चौक, रामनगर पोलीस स्टेशन समोर उभारणी करण्यात आली आहे. मा. राजेश मोहिते, आयुक्त चंद्रपूर महानगरपालिका यांच्या हस्थे आज या श्वास घेणाऱ्या कृत्रिम फुफुसांचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. ‘श्वास घेणारी कृत्रिम फुफुसे” या उपक्रमाचा उद्देश हा चंद्रपूर शहराचे नागरिक किती प्रदूषित हवेत श्वास घेताहेत व तसेच चंद्रपूरकरांच्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतो हे आता प्रत्यक्ष रित्या या कृत्रिम फुफुसंद्वारे पाहता येणार आहे. १२ फुट इतक्या उंचीची उभारण्यात आलेले (लंग्जबिलबोर्ड) फिल्टर मीडिया पासून तयार केले असून ते शुभ्र पांढऱ्या रंगाचे आहेत. या बिलबोर्डला मागे 'बाहेर हवा फेकणारे पंखे' (exhaust fan) बसवण्यात आले आहेत. जशी मानवी श्वसनाची प्रक्रिया काम करते तसेच हे बिलबोर्ड काम करत आहेत. या बिलबोर्डवर एक हवेची गुणवत्ता तपासणारे यंत्र (रिअल-टाईम एअर क्वालिटी मॉनिटर) बसवण्यात आले आहे. जे प्रत्येक क्षणाची हवेची गुणवत्ता दर्शवते. काही दिवसांत ही शुभ्र पांढऱ्या रंगाची फुफुसे हळूहळू काळी पडत जातील त्यानुसार संबंधित परिसरातील हवा किती खराब आणि अशुद्ध आहे त्याबद्दल नागरिकांना समजेल. हे बिलबोर्ड लावण्याचा उद्देश म्हणजे लोकांच्या आरोग्यावर, त्यांच्या फुफुसांवर हवा प्रदूषणाचा काय दुष्परिणाम होत आहे हे दृश्य स्वरुपात दाखवण्यासाठीचा प्रयोग आहे. या कार्यक्रमावेळी बंडू धोत्रे (संस्थापक-इको-प्रो), मा. सुरेश चोपणे (संस्थापक - ग्रीन प्लानेट सोसायटी), पप्पू देशमुख (गटनेते , चंद्रपूर महानगरपालिका) मझर अली (अध्यक्ष चंद्रपूर पत्रकार संघ), राहुल सावंत (समन्वयक वातावरण फाउंडेशन) योगेश दुध पचारे(गीन प्लानेट सोसायटी) इ. उपस्थित होते.
श्वास घेणारी कृत्रिम फुफुसे Artificial lung या उपक्रमातून जनतेमध्ये जागृती निर्माण होण्यास मदत होणार असून स्वच्छ हवेचे धेय्य गाठण्यासाठी जनसहभाग निर्माण होण्याच्या दृष्ठीने हे महत्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे मा. आयुक्त या कार्यक्रमावेळी बोलत होते.
‘इको प्रो संस्थेचे संस्थापक बंडू धोत्रे’ म्हणाले कि, गेल्या काही वर्षांपासून चंद्रपूर शहराचे हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणत वाढले आहे. लहान मुलांच्या फुफुसांवर त्याचा गंभीर दुष्परिणाम होत आहे. असे असतानाही चंद्रपूर शहराचे नागरिक या संदर्भात भूमिका घेत नाहीत. आता ह्या कृत्रिम फुफुसांच्या माध्यमातून आपली लहान मुले नेमक्या किती प्रदूषित हवेत श्वास घेत आहेत हे चंद्रपूरच्या जनतेला प्रत्यक्ष पाहता येणार आहे. त्यासाठीच ह्या कृत्रिम फुफुसांची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
वातावरण फाउंडेशनचे समन्वयक राहुल सावंत म्हणाले कि, पृथ्वी वाचवू शकणारी आपली पिढी हि शेवटची पिढी आहे. आजच्या आधुनिक जगाच्या उंबरठ्यावर हवा प्रदूषण हि सर्वात घातक समस्या म्हणून समोर येत आहे. जोपर्यंत या समस्येवर सर्व सामान्य जनता बोलत वा कृती करत नाही तोपर्यंत हि समस्या सोडवता येणे शक्य नाही. सर्वसामान्य जनतेचा सर्वोतपरी सहभागच या समस्येवर सामुदायिक कृतीतून उत्तर काढू शकत असल्याचे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.
सावंत पुढे म्हणाले कि, मुळात कोणती महामारी आली कि आपण जागे होतो आणि महामारी गेली कि आपण संत अवस्थेत जातो मात्र महामारीच्या आधी आणि नंतर सातत्याने सुरु असणाऱ्या मृत्यू सत्राला आपण दुर्लक्षित का करत आहोत ? जर येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित वातावरण ठेवायचे असेल तर आपल्याला प्रशासन आणि जनता यांच्या एकत्र समन्वयाने स्वच्छ हवेचे धेय्य स्वीकारायला हवे. त्यासाठी चंद्रपूर शहराच्या सर्व नागरिकांनी पुढाकार घ्यावा व ‘स्वच्छ हवा सर्वांसाठी’ हे ब्रीद समोर ठेवावे.
या कार्यक्रमावेळी ग्रीन प्लानेट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मा. सुरेश चोपणे यांनी "कोरोना मुळे वापरलेला मास्क Mask काढु नका ,चंद्रपुर शहरात आता प्रदूषणासाठीसुध्दा मास्क वापरा आणि आपले आरोग्य Health सांभाळा. स्वतः जागृत रहा आणि लोकांना जागृत करण्याचा संदेश यावेळी दिला.
हवा प्रदुषणाचा आरोग्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतो या विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी श्वास घेणारी फुफुसे (बिलबोर्ड ) हे योग्य मध्यम आहे.
जेंव्हा वातावरण फाउंडेशनने हा उपक्रमाची सुरुवात बांद्रा Bandra येथे केली होती तेंव्हा ते १४ दिवसांनी हि फुफुसे पूर्णतः काळे झाले होते परंतु, चंद्रपूर शहरात स्थापन केलील्या फुफुसांचा एकाच दिवसात रंग बदलण्याची सुरुवात झाल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
चंद्रपूर आणि परिसरातील हवा प्रदूषणाचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याची दाखल घेत मा. आयुक्त यांनी हा उपक्रम केवळ वातावरण फौंडेशन किंवा इको प्रो सारख्या संस्था संघटनांचा नसून स्वत महापालिका प्रशासन यामध्ये सहभागी आहे. तसेच माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत स्वच्छ हवेचे धेय्य गाठण्याची भूमिका राज्य सरकारची असल्याने हा उपक्रम म्हणजे एका प्रकारे राज्यशासनाच उपक्रम आहे. स्वच्छ हवेचे धेय्य गाठण्यासाठी स्थानिक प्रशासन म्हणून महानगरपालिका चंद्रपूर हि सर्वार्थाने आपल्या सोबत असेल असे आश्वासन मा. आयुक्तांनी या कार्यक्रमावेळी बोलताना दिले.
सावंत यांच्या मते सोशल मिडीयाचा उपयोग करून स्तापित केलेल्या श्वास घेणाऱ्या फुफुसांना आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच नागरिकांनी या उपक्रमाला भेट द्यावी, त्यासोबत फोटो घ्यावे आणि आमच्या सोशिअल मिडिया माध्यमावर आम्हाला टँग करावे असेही आवाहन आम्ही करत आहोत. याबरोबरच चंद्रपूर शहरातील वाढत्या हवा प्रदूषणाबद्दल लोकप्रतिनिधींनीही भूमिका घ्यावी, आवाज उठवावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
अधिक माहितीसाठी संपर्क
बंडू धोत्रे - 93703 20746
राहुल सावंत - 9930749875