वरोरा - वरोरा तालुक्यातील आल्फर आणि मोखाडा रस्त्यावरील शेतात असलेल्या विहिरीत वाघ पडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शिकारीच्या शोधात असलेला हा वाघ रात्री शेतकरी गमन शिरपाते यांच्या शेतात असलेल्या विहिरीत हा वाघ पडला. The tiger fell into the well
वाघ विहिरीत पडल्याची वार्ता गावात हवेसारखी पसरली असता नागरिकांनी घटनास्थळी पोहचत तोबा गर्दी केली, याबाबत वनविभागाला सूचना दिली असता वनविभाग तात्काळ त्याठिकाणी पोहचला मात्र नागरिकांची गर्दी नियंत्रित करणे शक्य झाले नाही.
वनविभाग त्या वाघाला विहिरीबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. Incident in chandrapur district
