प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - दिनांक 03/10/2021 रोजी तहसिल कार्यालय, मूल येथे राकेश या.रत्नावार,अध्यक्ष,संजय गांधी निराधार योजना समिती यांचे अध्यक्षतेखाली लाभार्थ्याचे प्रकरणे मंजूर करण्याकरिता सभा आयोजित करण्यांत येऊन इंदिरा गांधी विधवा योजना व संजयगांधी निराधार योजना - 23, श्रावणबाळ योजन-74 वृध्दपकाळ योजना-58 असे एकूण 155 प्रकरणे मंजूर करण्यांत आले.
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृध्दपकाळ योजनेत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज सादर केलेले आहे परंतु, सदर प्रकरणात ज्या कांही त्रृटी आहेत त्या त्रृटया तात्काळ दुरूस्त्या करून विशेष सभा आयोजित करण्यांबाबत निर्णय घेण्यांत आलेला होता. निर्णयाचे अनुषंगाने 1 महिण्यांत पुन्हा सभा घेवून लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात येऊन समिती शब्द पाळलेला आहे. Sanjay Gandhi Niradhar Yojana
तसेच, माहे जुलै,ऑगष्ट्र महिण्यांचे शासनाकडून अनुदान प्राप्त न झाल्यामूळे अनुदान वितरणास थोडा विलंब झालेला होता परंत, समितीचे वतीने पाठपुरावा करण्यांत येऊन अनुदान प्राप्त झालेले असून मंजूर लाभार्थ्यांना त्यांचे खात्यात अनुदान जमा करण्यांची कार्यवाही सुरू करण्यांत आलेली आहे.
तसेच, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष श्री.राकेश या.रत्नावार यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना फायदा होण्यांचे दृष्टीने प्रयत्नशिल आहेत. सदर योजने संबंधाने कांही अडचणी असल्यास तहसिल कार्यालयाचे कर्मचारी यांचेशी संपर्क साधुन कागदपत्राची पुर्तता करण्यांत यावी. व दलालापासून सावधान राहावे.याऊपरही काही अडचण असल्यास संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व सदस्य यांचेशी संपर्क साधावा.
सदर सभेला संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष, मा.राकेश या.रत्नावार, मा.ठाकरे साहेब,नायब तहसिलदार, तसेच, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य,श्री.गंगाधर कुनघाटकर,श्री.दशरथ वाकुडकर, श्री.संजय गेडाम, व संजय गांधी निराधार योजनेचे संबंधित कर्मचारी श्री.गिरडकर उपस्थित होते.
