चंद्रपूर - चंद्रपूर येथील दि. 28/10/2021ला. राधा क्रिष्ण सेलीबीशन हॉल मधे GLAMOROUS BEAUTY, मॉडलींग स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती, सौ. प्रतिभा बाघमारे राखी झांबरे, सुर्वना दुधे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेमध्ये भद्रावती येथील ओ. एफ चांदा (डीफेन्स ) ची निवासी प्राजक्ता गेडाम ही मिस इंडीया स्टार 2021, 2nd Runner up ची मानकरी ठरली. प्रसिद्ध सिने अभिनेत्री अमिशा पटेल Amisha Patel यांच्या हस्ते प्राजक्ताला पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारासाठी प्राजक्ता गेडाम हीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्राजक्ताने यशाचे श्रेय आपल्या परिवार आणि गुरुजनांना दिले आहे.
