ब्रम्हपुरी :-- राज्यात परिवहन मंडळातील कर्मचारी मागील काही दिवसांपासून आंदोलन करीत आहे, राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी कर्मचाऱ्यांनी राज्यभर आंदोलन पुकारले आहे.
ऐन दिवाळीत सुरू झालेल्या आंदोलनामुळे प्रवाश्यांचे हाल बघायला मिळत आहे.
मात्र या आंदोलनात अनेक कर्मचाऱ्याने आपले आयुष्य संपविले, अशीच एक दुःखद घटना ब्रम्हपुरी येथे घडली, ब्रम्हपुरी आगारातील वाहतूक नियंत्रक Traffic controller suicide सत्यजित ठाकूर याने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. Maharashtra State Transport Corporation Movement
मागील 3 दिवसापासून सत्यजित कुणाला भेटला सुद्धा नाही, आज सकाळी शेजाऱ्यांनी घरचे दार ठोठावले असता सत्यजित ने प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे शेजाऱ्यांनी दार तोडून आत प्रवेश केला.
त्यावेळी सत्यजित हा मृतावस्थेत होता.
सध्या परिवहन महामंडळ राज्यसेवेत विलीनीकरण करावे या आंदोलनाला 100 टक्के प्रतिसाद मिळत असला तरी काही कर्मचारी ऐन दिवाळीत नैराश्य अवस्थेत जात आहे.
