चंद्रपूर - जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे यावर नियंत्रण मिळावे यासाठी चंद्रपूर पोलीस प्रशासन प्रयत्नरत आहे.
8 नोव्हेम्बरच्या पहाटे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना गोपनिय माहिती मिळाली की बल्लारपूर मार्गाच्या बाजूला असलेल्या बाबा नगर एका घरात काही लोक 52 पत्त्यांचा खेळ पैसे लावून खेळत आहे.
माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक IPS कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या चमुसह त्या घरी धाड मारली असता त्याठिकाणी 12 पत्ते बहाद्दरांसह 1 विधिसंघर्ष बालक सहित 1 लाख 97 हजार 250 रुपये रोख, 11 मोबाईल, 3 चारचाकी वाहन व 3 दुचाकी वाहन असा एकूण 36 लाख 57 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींमध्ये काही चंद्रपूर जिल्ह्यातील कोंबडा बाजार व जुगारक्लब चालक यांचा समावेश आहे. Gambeling
राजुरा येथील 29 वर्षीय गोलू उर्फ ईश्वर सुधाकर ठाकरे, महाकाली कॉलरी चंद्रपूर येथील 44 वर्षीय राजेश रामचंद्र गुप्ता, 41 वर्षीय प्रदीप दीपक गंगमवार, जिल्हा यवतमाळ वणी येथील 53 वर्षीय हाफिज रहमान खलील रहमान, यवतमाळ घाटंजी येथील 30 वर्षीय शेख आसिफ शेख चांद, मारेगाव यवतमाळ येथील 29 वर्षीय नंदू रामराव खापणे, गडचांदूर येथील 35 वर्षीय गणेश रामदास सातपाडे, विवेकनगर चंद्रपूर येथील 50 वर्षीय समीर सचिन संखारी, लक्कडकोट येथील 30 वर्षीय आकाश चंद्रप्रकाश रागीट, नांदाफाटा, कोरपना येथील 26 वर्षीय गौरव लक्ष्मण बंडीवार, लालपेठ कॉलरी चंद्रपूर येथील 50 वर्षीय श्रीनिवास रामलू रंगेरी, बाबूपेठ येथील 53 वर्षीय सुरेश पुनराज वावरे यांचा समावेश आहे.
आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.
सदरची यशस्वी कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक IPS अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याने केली.
