वरोरा - चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील आल्फर आणि मोखाडा रस्त्यावरील गमन शिरपाते या शेतकऱ्याच्या शेतात रविवारी रात्री शिकारीच्या शोधात असलेला वाघ पडला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. विहीरीत वाघ पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांनी तोबा गर्दी केली. वनविभागाला माहिती होताच वनविभागाची चमू घटनास्थळी पोहोचली, वाघाच्या रेस्क्यू साठी rescue वनविभागाने प्रयत्न केले मात्र नागरिकांच्या गोंधळाने वनविभागाला वाघाला रेस्क्यू करणे शक्य झाले नाही, वनविभागाने विहिरीत खाट ठेवली असता वाघाने त्या खाटेवर बसत विहिरीच्या बाहेर उडी मारीत शेतात पळून गेला. Tiger
