बल्लारपूर - 8 मे 2019 ला बल्लारपूर शहरातील वाजपेयी हॉटेल मध्ये काम करणारी मुलगी कामावरून एकटी घरी जात असताना रेल्वे क्वार्टर्स च्या बाजूला लघु शंकेला बसली होती, त्यावेळी 28 वर्षीय शंकर बाबुराव यादव याने त्या मुलीला धमकवीत रेल्वे पटरी (रेल्वे यार्ड )कडे नेत तिच्यावर जबरी संभोग केला.
सदर घटनेची मुलीने बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असता पोलिसांनी कलम 376 अंतर्गत आरोपीवर बलात्काराचा गुन्हा नोंद केला.
सपोनि धर्मेंद्र जोशी यांनी आरोपीला अटक करून त्याचे विरोधात न्यायालयात सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.10 years imprisonment
साक्षीदार तपासून योग्य पुराव्याच्या आधारे चंद्रपूर न्यायालयाने आरोपी शंकर बाबुराव यादवला 10 वर्ष कारावासाची शिक्षा व 2 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने कारावासाची शिक्षा सुनावली.
Rapist
कारावासाची शिक्षा प्रभाकर जयराम मोडक , अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंद्रपुर कोर्ट ३ रे चंद्रपुर यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणामध्ये सरकार तर्फे अॅड आसीफ शेख, सरकारी अभियोक्ता, चंद्रपूर आणि कोर्ट पैरवी म्हणुन पोहवा भगवान दा मेश्राम, पोलीस स्टेशन बल्लारशा यांनी काम पाहिले.