गडचांदूर(सै.मूम्ताज़ अली):-
औद्योगिक नगरी गडचांदूर येथे सध्या सैराट दुचाकी स्वारांनी कमालीचा हैदोस घातला आहे. वाहतूकीच्या सर्व नियमांना तिलांजली देत यांनी संपूर्ण शहरात धिंगाणा घातला आहे.विशेषत: नवीन बुलेटच्या bullet सायलेंसरचा कर्कश आवाज ध्वनिप्रदूषणाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करत असल्याने नागरिकांसाठी त्रासदायक होत असून काणांचे पडदे फाटण्याची वेळ आली आहे.तसेच नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला असून जीव टांगणीला लागला आहे. "कारवाई करणारे सुस्त, सैराट दुचाकीस्वार मस्त" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.यांना कुणाचाही धाक उरलेला दिसत नसून महिला,लहान मुले, वृद्धांना अक्षरशः जीव मुठीत धरून घरा बाहेर पडण्याची वेळ आली आहे.अखेर यांचा आतंक थांबणार तरी कधी ? असे प्रश्न उपस्थित करत "अहो साहेब,सैराट बाईकस्वारांचे बंदोबस्त कराना" अशी याचना त्रस्त नागरिकांनी केली आहे. Rash driving
दिवसंदिवस शहरात वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. जेव्हापासून शहरात मुख्य मार्ग तयार झाले,तेंव्हापासून जणू अल्पवयीन मुलांसह इतर दुचाकीस्वारांना सुगीचे दिवस आल्याचे अनुभवास येत आहे.यांचा अशाप्रकारे सुरू असलेला आतंक संपणार तरी कधी ? अशी विचारणा नागरिकांनी केली असून यांच्याकडे चालक परवाना नाही,यांना वाहतूकीचे नियम माहीत नाही, तरीपण हे सर्रासपणे,बिनधास्त डबल,टिबल सिट बसवून बेभानपणे बाईक चालवत असल्याने एकीकडे वाहतूक नियमांची वाट लागत आहे.तर दुसरीकडे यांच्यामुळे अपघाताची शक्यता सुद्धा बळावली आहे. यांच्यामुळे जर एखाद्या घरचा कर्ता पुरुष अपघातग्रस्त झाला तर परिवार रस्त्यावर येईल,याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे."पालक घरी आणि बालक बाईक घेऊन रस्त्यावर" अशी परिस्थिती पहायला मिळत असून भविष्यात होणाऱ्या घटनांवर वेळीच आळा बसावा यासाठी पोलीस विभागाने जातीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र आता करवाईला सूरूवात कधी होणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
Accident
