प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मुल तालुक्यातील मौजा गोवर्धन येथील भाजपच्या सक्रिय माजी सरपंच कल्पना अमन खोब्रागडे यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांसह भारतीय राष्ट्रीय कांग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्र राहायचे बहुजन कल्याण, मदत पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.विजय वडेट्टीवार व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत, बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, यांनी कांग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचे पंजाचा दुपट्टा टाकून स्वागत केले. माजी सरपंच यांचेसह शशिकला गजानन परचाके, अमन खोब्रागडे, साहिल कडुकर, श्रवण मोहूर्ले, कवडू मशाखेत्री, अमित मशाखेत्री यानीही प्रवेश केल्याने त्यांचेही कांग्रेस तर्फे स्वागत केले. याप्रसंगी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व संचालक राकेश रत्नावार, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ,भेजगाव येथील सरपंच अखिल गांगरेड्डीवार, संचालक किशोर घडसे, ग्रामीण कांग्रेस नेते दीपक पाटील वाढई, ग्राम पंचायत सदश समीर काळे, गणेश खोब्रागडे, माजी सरपंच सुमित आरेकर, यांचेसह तालुका व शहर कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. Bjp Ex Sarpanch Join Congress
