चंद्रपूर - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, केंद्र व राज्य सरकार मिळून आपत्ती व्यवस्थापन निधीतून कोरोनात मृत्यू झालेल्या कुटुंबाना 50 हजार रुपये निधी देत आहे. कोरोनाच्या लाटेमध्ये हॉस्पिटलच्या लाखोंच्या बिलामुळे आज अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली आहेत. Corona period
घरच्या कर्ता पुरुषाचे कोरोनामुळे निधन झाल्याने अनेक महिला विधवा होऊन निराधार झाल्या आहेत. या महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठीही आर्थिक मदत गरजेची आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील कोरोनात विधवा झालेल्या महिलांना केंद्र व राज्य सरकार या दोघांनी मिळून फक्त ५०,००० रु न देता केंद्र व राज्य सरकार या दोघांनीही स्वतंत्र एक लाख रुपये द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी निवेदनाद्वारे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर अध्यक्ष रामू तिवारी, सेवा काँग्रेस फाऊंडेशन च्या शीतल कातकर, उपाध्यक्षा परवीन सय्यद हाजी सय्यद अली, मंगला शिवरकर, सुष्मा बनसोड, माला माणिकपुरी, भाग्यश्री खणके यांची उपस्थिती होती. Mahila Congress
