गडचांदूर :- गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती 14 नोव्हेंबर रोजी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य धर्मराज काळे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.प्रा. प्रदिप वांढरे जेष्ठ शिक्षक महेंद्र कुमार ताकसांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.सर्वप्रथम पंडितजींच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.उपस्थीत मान्यवरांनी पंडितजींच्या जीवनकार्यावर सखोल मार्गदर्शन केले.याप्रसंगी जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारीत शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. यात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.प्रशांत खैरे, आभार ज्योति चटप यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला विद्यार्थी,शिक्षक,प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. Pandit nehru
