प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - शेतकरी विरोधी मोदी सरकारने अखेर तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यासाठी मागील वर्षीपासून शेतकरी दिल्ली बॉर्डरवर Delhi Border तळ ठोकून आंदोलन करत होते. या आंदोलनात चारशेहून अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला. उत्तर प्रदेशात भाजपाच्या काही नेत्यांनी तर अक्षरशा: आंदोलनकारी शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले व जीव घेतला. कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांची विटंबना होताना संपूर्ण विश्वाने पहिल्यांदाच बघितले. Agricultural laws
शेतकऱ्यांच्या आंदोलनाची संपूर्ण जगाने दखल घेऊन मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. पुढील वर्षी होणार्या राज्यांच्या निवडणुका तसेच जगात व देशात होणारी नामुष्की टाळण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. शेतकरी विरोधी कायदे करून आंदोलनातील निष्पाप शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या मोदी सरकारने अखेर तिनेही कृषी कायदे रद्द केले याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी आभार मानले. तसेच शेतकऱ्यांनी मोठ्या ताकतीने आंदोलन करून तीनही कृषी कायदे रद्द करण्यास सरकारला भाग पाडले त्याबद्दल संपूर्ण शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. Repeal of agricultural laws