प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - स्वातंत्र नंतर पंतप्रधान पदावर सर्वाधिक अधिक काळ १६ वर्ष देशाचा राज्यकारभार सांभाळून गरीब,दलित,शोषित,पीडित बेरोजगार, शेतकरी, कामगार, व्यापारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व महिला यांना समान न्याय देणाऱ्या,गरिबी हटवाचा नारा देणाऱ्या आणि भारतात राष्ट्रीय एकात्मता व अखंडता टिकवून ठेवणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला महिला पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्य विनम्र अभिवादन कार्यक्रम मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात घेण्यात आला. स्व.इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेला तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर, कांग्रेस शहर अध्यक्ष सुनील शेरकी, मुल तालुका सरपंच समितीचे अध्यक्ष,भरजगावचे सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अखिल गांगरेड्डीवार, आनंद कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बंडूभाऊ गुरनुले, नगर परिषद माजी उपाध्यक्ष चंदू चतारे, साई मित्र परिवाराचे मुख्य संयोजक विवेक मुत्यलवार, शहर कांग्रेस उपाध्यक्ष कैलास चलाख, सामाजिक कार्यकर्ते सुरेश फुलझेले, यांचेसह कांग्रेस कार्यकर्ते व ओबीसी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित राहून स्व.इंदिराजी गांधी यांना अभिवादन केले. Indira gandhi birth anniversary