चंद्रपूर - 17 नोव्हेम्बरला भर दिवसा सरकारनगर, अरविंद नगर येथे 5 अज्ञात लोकांनी दरोडा टाकला होता, घरात 2 वृद्ध महिलांच्या गळ्याला चाकु लावीत व बंदुकीचा धाक दाखवीत पलंगाच्या बॉक्स मधील थैल्यात ठेवलेली 1 कोटी 73 लाख 50 हजारांची रोख रक्कम घेत त्यांनी पळ काढला.
या प्रकरणी 33 वर्षीय नाजनीन हारून कोळसावाला यांनी फिर्याद नोंदवला, रामनगर पोलीस स्टेशनमध्ये या बाबत गुन्हा दाखल करीत तपासाला सुरुवात करण्यात आली. Big Robbery in chandrapur
पैश्यांच्या 5 थैल्या घेत अज्ञात दरोडेखोरांनी पांढऱ्या रंगाच्या गाडीने पळ काढला होता, पोलीस निरीक्षक मधुकर गीते यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथक तयार केले.
स्थानिक गुन्हे शोध पथकातील सपोनि हर्षल एकरे व पोउपनी भुरले व पोलीस कर्मचाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली. Crime chandrapur
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासायला सुरुवात करीत खबरी नेटवर्क ऍक्टिव्ह केले, आरोपींचा शोध घेण्यासाठी हर्षल एकरे पथकासह नागपूरला रवाना झाले, 2 आरोपींना एकरे यांनी ताब्यात घेतले, व आरोपीनी ज्या वाहनाने पोबारा केला होता ते वाहन क्रमांक MH27BE0751 व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन क्रमांक MH34V5999 ताब्यात घेत तब्बल 4 आरोपींना अटक करीत त्यांच्याजवळ असलेली 2 हजार व 500 च्या नोटा असा एकूण 1 कोटी 73 लाख 50 हजारांची रोख रक्कम जप्त केली.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधिक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, उपविभागिय पोलीस अधिकारी नंदनवार, यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक मधुकर गिते, सपोनि हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले, पो.हवा. रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, नापोशि / पुरूषोत्तम चिकाटे, विनोद यादव, पेतरस सिडाम, किशारे वैरागडे, आनंद खरात, पांडुरंग वाघमोडे, निलेश मुडे, सतिश अवथरे, पोशि लालु यादव, विकास जुमनाके, माजीद पठान, हिरालाल गुप्ता, मनापोशि भावना तसेच सायबर पोलीस स्टेशन, चंद्रपुर येथील पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.
विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आली कुठून हा यावर सध्या प्रश्नचिन्ह आहे.
पोलिसांनी आरोपींना ट्रॅक कशाप्रकारे व त्यांचे नावे जाहीर करण्यात कमालीची गुप्तता बाळगली आहे.