चंद्रपूर :--चंद्रपूर जिल्ह्यातील संपकरी एसटी कामगारांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. 14 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रशासनाने निलंबन केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा आगार- चंद्रपूर आगार आणि विभागीय कार्यशाळा या 3 घटकातील 14 कर्मचाऱ्यांचा या निलंबन यादीत समावेश आहे. दिवाळीआधी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संप झाला. काही तासात तो मिटविण्यात आला. मात्र थातूरमातूर आश्वासने पदरी पाडून घेण्यापेक्षा शासन सेवेत विलीनीकरण व्हावे यासाठी चंद्रपूरातूनच अनिश्चित कालीन संपाची सुरुवात झाली. 14 ST employees suspended
हे आंदोलन मग राज्यभरात पसरले. अनिश्चितकालीन संपाची सुरुवात ज्या जिल्ह्यातून झाली त्याच जिल्ह्यात निलंबनाची सुरुवात देखील झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाईच्या घटनेने कर्मचाऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. आयुष्यभर शिस्तीत सेवा केल्याचे फळ सरकारने दिल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची धार कमी करण्यासाठी सरकारने हा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया आता उमटली आहे. 36 एसटी कर्मचारी हुतात्मे झाले त्यापुढे निलंबन क्षुल्लक असल्याची भावना संप आणि मागण्यांवर ठाम असलेले कर्मचारी व्यक्त करत आहेत. 376 st employee suspended in Maharashtra
एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला हा संप बेकायदेशीर असल्याचे म्हणत परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्याविरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे, कर्मचाऱ्यांच्या संपा विरोधात राज्य सरकार कठोर भूमिकेत आली असून त्यांनी राज्यभरातील 16 विभाग 45 आगारातील एकूण 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
