मूल (गुरू गुरनुले)
नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील विविध बांधकामाचे कंत्राट अनधिकृतरित्या नगरसेवकांना घेता यावा म्हणून रचलेला डाव पालकमंञ्याच्या हस्तक्षेपामूळे उधळला असून सदर डाव मुख्याधिका-यांच्या अंगलट येण्याची चर्चा आहे.
प्रधानमंत्री कल्याण निधी अंतर्गत नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १,२,३,५,७ आणि ८ मध्ये सिमेंट क्राॅक्रीट रोड बांधकाम, सिमेंट क्राॅक्रीट नाली बांधकाम, पेविंग ब्लाॅक बसविणे, रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण करणे आदि काम करण्यासाठी बांधकाम विभागाच्या नोंदणीकृत अनुभवी कंत्राटदारांकडून ८ नोव्हेंबर २०२१ च्या दुपारी ३ वाजता पर्यंत निवीदा मागविण्यात आल्या. वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या जाहीरातीनुसार १० लक्ष पेक्षा जास्त रक्कमेच्या कामाच्या निवीदा शासनाच्या संकेतस्थ्ळावरून तर १० लक्ष पेक्षा कमी रक्कमेच्या एकुण अकरा कामाच्या निवीदा नगर परिषदेच्या सुचना फलकावर प्रसिध्द करून २२ आँक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत टक्केवारी दराने निवीदा मागविण्यात आल्या. शहरातील अकरा काम १० लक्ष पेक्षा कमी खर्चाच्या असल्याने सदर काम करण्यासाठी नोंदणीकृत अनेक कंत्राटदार इच्छुक होते निवीदा फार्म घेण्यासाठी ते नगर परिषद कार्यालयात गेले. परंतू त्या ठिकाणी निवीदा फार्म देणारे कार्यालयीन लिपीक अनुपस्थित असल्याने अनेकांना निवीदा फार्म घेता आले नाही. निवीदा फार्म उपलब्ध न झाल्याने त्यांना दुपारी ३ वाजेपर्यंत निवीदा भरून सादर करण्यास अडचण गेली. सदर काम करण्याची इच्छा असतांनाही त्यांना काम करण्यापासून वंचित राहावे लागले. दरम्यान नगर परिषद मध्यें घडत असलेल्या सदर प्रकारा विषयी अनेकांना शंका आली. इच्छुकांना निवीदा फार्म घेवून निश्चित वेळेत भरू न देता येवू नये म्हणून कार्यालयातील संबंधीत लिपीकास अनुपस्थित राहण्यास सांगून वेळ मारून नेण्याचा डाव काही नगरसेवकांनी रचला. त्यानंतर मात्र संधी साधून आपल्या मर्जीतील कंत्राटदारांच्या नांवाने निवीदा फार्म भरून देवून सदर कामाचे कंत्राट नगरसेवक घेणार असल्याची माहिती कंत्राटदारांना समजली. नगर परिषदेद्वारा करण्यांत येणा-या कोणत्याही कामाचे कंत्राट नगर परिषदेचे पदाधिकारी आणि नगरसेवकांना घेण्याचा नियमानुसार अधिकार नाही. परंतू नगर परिषदेद्वारा करण्यात येणारे विविध कामाचे कंत्राट आपणांस मिळावे म्हणून अनेक नगरसेवक आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना हाताशी धरून त्यांचे नांवाने अनेक काम सर्रासपणे करीत आहेत. नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपण्यासाठी दिड महिण्याचा अवधी असल्याने सदर कामाचे कंत्राट अनधिकृतरित्या घेवून मलीदा खाण्याचा नगरसेवकांचा प्रयत्न असल्याची माहिती मूल भेटीवर असलेले जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार Guardian minister vijay vadettiwar यांना प्राप्त झाली. सदर प्रकार नियमबाहय असून इच्छुक कंत्राटदारांना काम करण्यापासून थांबविणारा असल्याने ना. विजय वडेट्टीवार यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांना विश्रामगृहात बोलावून सदर प्रकारा बाबत विचारणा केली. घडत असलेला प्रकार अयोग्य असून सदर प्रकार न थांबविल्यास यासंबंधी आपल्याविरूध्द कारवाई करण्यात येईल. अशी तंबी दिली. त्यामूळे मुख्याधिकारी यांनी नगरसेवकांनी रचलेल्या डावात सहभागी न होता दुपारी १२ वाजता नंतर सदर कामाची निवीदा प्रक्रिया रद्द केली. विहित मुदतीत निवीदा प्राप्त न झाल्याचे कारण समोर करून नगर परिषद प्रशासनाने निवीदा प्रक्रिया रद्द केली असे जाहीर केले असले प्रत्यक्षात माञ पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्तक्षेपामूळे नगर प्रशासनाला निवीदा प्रक्रिया रद्द करावी लागल्याची वास्तविकता जनतेसमोर उघड झाली.
निवीदा प्रक्रियेच्या चौकशीची मागणी
नगर परिषदे द्वारा प्रस्तावित असलेल्या विविध कामापैकी एक काम घेण्यास इच्छुक असलेले नोंदणीकृत कंत्राटदार सचिन चन्नेवार निवीदा फार्म घेण्यासाठी सकाळी १० वाजतापासून दुपारी २ वाजेपर्यंत नगर परिषद कार्यालयात उपस्थित होते. परंतु २ वाजेपर्यंत निवीदा फार्म देणारे लिपीक गैरहजर असल्याने त्यांना निवीदा फार्म भरण्यास अडचण गेली. म्हणून त्यांनी मुख्याधिकारी यांचेशी संपर्क साधून निवीदा फार्म उपलब्ध करून देण्याचा आग्रह केला. तेव्हा मुख्याधिकारी यांनीही उडवाउडवीचे उत्तर देवून निवीदा फार्म पासून वंचित ठेवल्याची तक्रार सचिन चन्नेवार यांनी केली असून संबंधीत कर्मचा-यावर कारवाई करावी. अशी मागणी केली आहे.
