गडचांदूर :- अंबुजा सिमेंट फाऊंडेशन Ambuja Cement Foundation येथील बिसीआय प्रकल्प समन्वयक स्व.संतोष विश्रोजवार वय 51 वर्ष यांचे 8 नोव्हेंबर 2021 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व मोठा अपत्य परिवार आहे. 9 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत मनमिळाऊ,मृदभाषी,उत्तम मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अशा आकस्मिक निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
