प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - दारू बंदी उठल्याने अधिकृत दारूची दुकाने सुरु झाली असली तरी पूर्वी पासूनच अवैद्य दारु ग्रामीण भागात खेड्या;पाड्यात पोहचून लाखोंचा व्यवसाय करणारा मुल येथील महाभाग एन दिवाळीच्या दिवशी एका स्कारपीओ मध्ये ३५ पेट्या अवैद्य दारूचे बाक्स भरुन मुल वरुन ताडाला मार्गे ग्रामीण भागात जात असताना महाबीज गोदामाजवळ गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात एक युवक ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडूनही पोलिसांना माहीत कशी का नाही याची चर्चा मुल नगरात केली जात आहे. अधिकृत दुकाने सुरु होऊनही काही मंडळी दारूचा अवैद्य व्यवसाय करीत आहेत. No Fir filled अवैद्य व्यवसायकरिता तालुक्यातील ग्रामीण खेड्यात एम एच-29-एडी-0933 क्रमांकाची स्कारपीओ गाडी देशी दारूच्या एकूण 35 पेट्या अवैद्य रित्या नेत असतांना तांडाळा मार्गावरील महाबीज गोदमाजवळ हा अपघात झाला. ही स्कार्पिओ गाडी मुल वरून भरधाव वेगाने दारू घेऊन जात असतांना अचानक समोरच टायर फुटला त्यामुळे चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदर वाहन मार्गाच्या कडेला असलेल्या झाडाला जोरदार धडक मारून उलटला. अपघाताच्या वेळेस सदर वाहनात चालकासह इतर दोघेजण होते. त्यापैकी एकाला गंभीर मार लागल्याने त्याला तात्काळ नागपूरला हलविण्यात आले. दरम्यान नागपूरला नेत असतांना एका युवकाचा मृत्यू झाला . इतर दोघे जनही जखमी असून त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरु आहेत. एवढी गंभीर घटना घडून दोन दिवस झाले तरी सुद्धा पोलिसांना माहीत होऊ नये याचे आश्चर्य व्यक्त केले जात असले तरी पोलिसांनी अजूनही गुन्ह्यांची नोंद केलेली नाही हे मात्र विशेष...
