प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - बल्लारपुरातील मोठ्या चर्च जवळील महाराष्ट बँके समोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला अचानक आग लागली.
वाहनाने पेट घेतल्यावर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती, लगेच नागरिकांनी अग्निशमन विभागाला याबद्दल सूचना दिली, अग्निशमन विभागाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले. The Burning Car
चारचाकी वाहन क्रमांक Pb65 AP 5963 हे वाहन शहरातील गिरीश माकोडे यांचे असल्याचे समजते, दिवाळीच्या सुट्ट्यात ते नुकतेच पंजाब वरून बल्लारपूर शहरात दाखल झाले होते.
सदर वाहनाला लागलेली आग ही फटाक्यांच्या आतिषबाजी मुळे लागली असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
