प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - शासनाने ई-पीक पाहणी अॅपच्या App माध्यमातून पीक पेरा नोंदणीसाठी शेतकर्यांना सूचना दिल्या परंतु या प्रक्रियेचा पुरेसा गावातील शेतकर्यांना अनुभव नसल्याने शेतकरी Farmer चिंतेत पडले होते,ही बाब लक्षात येताच शेतकर्यांना मदतीचा हात म्हणून मुल तालुक्यातील ग्रामपंचायत नवेगांव भूज.येथील उपसरपंच श्री.प्रोफेसर दे.सत्रे यांनी गावातील युवा परिवर्तन संघटनेला शेतकर्यांना सहकार्य करण्यासाठी आमंत्रित केले, गावचे उपसरपंच प्रोफेसर सत्रे व युवा परिवर्तन संघटनेचे कार्यकर्ते थेट शेतकर्यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन पीक नोंदणी करीत आहेत. त्यांच्या या सहकार्याने गावातील शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
नवेगांव भूज.येथील तलाठी Talathi श्री.एस. पिदुरकर सर यांनी ई-पीक पाहणी च्या नोंदणी बद्दल युवा परिवर्तन संघटनेच्या कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन देवून संघटनेच्या सहकार्याबद्दल सर्व युवकांचे कौतुक केले, सोबतच दिनांक 27/09/2021 ला मुल येथील उपविभागीय अधिकारी मान. महादेव खेडकर साहेब यांनी नवेगांव भूज.येथे प्रत्यक्ष भेट दिली असता युवा परिवर्तन संघटनेचे संघटक जितेंद्र चौधरी,सचिन घोगरे, प्रणय चुदरी,गणेश आरेकर,सुशील चुदरी,कुणाल बोरकुटे, संगम बोरकुटे, आदित्य वाघाडे,रविंद्र जवादे, धनराज झाडे,संकेत झाडे,शाहू चावरे,सुभाष बावणे,हरी पाल,अखिल तिवाडे,श्रीकृष्ण पाल,अतुल सत्रे नवनाथ पाल आदी सर्व युवकांनी गट तयार करून गावातील अनेक ठिकाणी शेतकर्यांना सोबत घेऊन पीक नोंदणी साठी सहकार्य करताना पाहून संघटीत युवकांची प्रशंसा केली व असेच सहकार्य करण्यासाठी युवक वर्गाला आवाहन केले आहे.
