प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - मुल तालुक्यातील नवेगाव (भुजला) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती सप्ताह व भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री former prime minister यांची जयंती त्याचप्रमाणे वन्यजीव सप्ताह Wildlife Week दिनाचे औचित्य साधून दिनांक 3/10/2021 रोजी युवा परिवर्तन संघटना नवेगांव भूज.च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मान. डाँ. मयूर कळसे संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मुल, यांचे हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिराची Blood Donation सुरवात उदघाटक संवर्ग विकास अधीकारी डाँ. मयूर कळसे यांनी स्वतः रक्तदान देऊन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.मान.यशवंत खोब्रागडे सरपंच नवेगांव भूज.प्रमुख अतिथी म्हणून मान.जीवन प्रधान विस्तार अधिकारी पं स. मुल श्री.मान.प्रोफेसर डि.सत्रे उपसरपंच नवेगांव भूज.उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.मान.अमोल पा.चुदरी माजी उपसभापती पं.स.मुल ,मान.न. ज.आरेकर सर से.नि.मुख्याध्यापक वि.विद्या.बेंबाळ ,भोजराज पा.चावरे पोलीस पाटील,श्रीरंग पा.बोरकुटे तं.मु.समिती अध्यक्ष,हिमानी वाकुडकर सरपंच नांदगाव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामधून युवा परिवर्तन संघटनेचे संघटक प्रेरक चौधरी यांनी संघटनेचे कार्य, उद्दिष्ट गावाच्या विकासासाठी महत्वाची भूमिका याची माहिती दिली. गावाच्या इतिहासातच प्रथमच होत असलेल्या रक्तदान शिबिराच्या आयोजनाबाबत डाँ.मयूर कळसे यांनी युवा परिवर्तन संघटनेचे कौतुक केले. ग्रामीण भागात रक्तदान बाबत असलेले गैरसमज दूर करण्याचे महत्व पटवून दिले. प्रमुख अतिथी माजी उपसभापती अमोल पा. चुदरी, माजी मुख्याध्यापक नत्थुपाटील आरेकर यांनी सामाजिक हिताचे कार्य असल्याचे सांगितले. तर अल्प काळात गावाच्या विकासासाठी नवनवीन उपक्रम राबविणारे तरुण उपसरपंच प्रोफेसर डी.सत्रे यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर आयोजित केल्याने संघटनेचे कौतुक केले. रक्तदान शिबिरामध्ये ६३ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले अमूल्य दान असल्याचे दाखवून दिले. कार्यक्रमाचे संचालन गणेश आरेकर यांनी केले. तर आभार सचिन घोगरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या याशीस्वीतेसाठी युवा परिवर्तन संघटनेचे सर्व युवक व ग्रामस्थांनि सहभाग दर्शवून सहकार्य केले.
