News - Whatsapp, Instagram, facebook आणि Facebook Massanger मध्ये तांत्रिक अडचणी आल्याने जगभरात हे समाज माध्यम बंद झाले आहे.
सदरची सेवा मोबाईल सह Computer मध्येही Whatsapp चालत नसून वापरकर्ते यामुळे चांगलेच त्रासले आहे.
जगभरात या सेवांचा वापर कोट्यवधी नागरिक करीत असून तांत्रिक अडचणीमुळे अनेकांच्या तक्रारी यायला सुरू झाल्या आहे.
दररोज अब्जावधी मॅसेजची देवाणघेवाण या समाज माध्यन्मावरून होत असते,
ही सेवा ठप्प झाल्याने अनेक युजर्सना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सर्व्हर डाऊन झाल्यानं गेल्या पाऊण तासापासून व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुकचा वापर करता येत नाहीए. अनेकांनी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला आहे. फेसबुक आणि व्हॉट्स ऍप यांनाही त्यांच्या वापरकर्त्यांमध्ये पोहोचण्यासाठी ट्विटरचाच आधार घ्यावा लागला आहे. 'काहींना आमच्या सेवेचा वापर करताना अडचणी येत आहेत. ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुरू आहे. तसदीबद्दल क्षमस्व,' असं ट्विट फेसबुक, व्हॉट्स ऍपनं केलं आहे.
