कोरपना - कोरपना पोलिस स्टेशन हद्दीतील मांडवा शिवारातील घटना असून दूपारी २ वाजता उघडकीस आली. Husband wife die
मृतक पती - पत्नी अरुण श्रीनिवास डाहूले वय ४२ वर्षे व छाया अरुण डाहुले वय ३८ वर्षे रां मांडवा येथील असून नेहमी प्रमाणे सकाळी नऊ वाजता बैल बंडीने शेतात जात असताना बैलांना पाणी पाजण्यासाठी रस्त्यावरील वंन बंधाऱ्यात गेला असता बंधाऱ्यातील खोल पाण्यात डूबुन मृत्यु झाल्याची घटना सकाळी नऊ ते दहा वाजेदरम्यान घडली सदर घटणेची माहिती पोलीस स्टेशन कोरपना यांना मिळाली असता ठाणेदार ढाकणे साहेब याच्या मार्गद्शनाखाली Husband and wife drown in dam प्रभाकर जाधव हवालदार याच्या सोबत पोलिस शिपाई रामा पुष्पकोल भगवान पडवाल अविनाश ठोके शिवाजी घटना स्थळ गाठून शव पाण्याबाहेर काढले. Korpana police
घटनेचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे आणण्यात आले सदर मयत शेतकऱ्याकडे दोन एकर शेती होती ठेक्याने शेती करून उदर निर्वाह करीत होता, त्याला एकच मुलगा असून दहाव्या वर्गात शिकत आहे. या घटनेत बंडीवर असलेला बकर्याचा मृत्यु झाला असून बैल मात्र बचावले पुढील तपास कोरपना पोलिस करीत आहे.
