गडचांदूर :- गडचांदूर व परिसरातील सिमेंट कंपन्यामध्ये विविध ट्रांस्पोर्ट कंपनीकडून सिमेंटची वाहतूक होते.या कंपन्यांनी वाहन उभी करण्यासाठी यार्ड सुध्दा बनवले मात्र ही वाहने यार्ड सोडून चक्क रस्त्यावरच उभी केली जात आहे.यामुळे वाहतुकीला मोठ्याप्रमाणात अडथळा निर्माण होत असून अपघात वाढले आहे.पुर्वी नगरपरिषदेकडून ठिकठिकाणी "नो-पार्कींग झोन" No Parking Zone चे फलक लावण्यात आले होते. परंतू याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही. सिमेंट कंपनीत येणार्या वाहनांना कंपनीच्या पार्किंग यार्डमध्ये उभे करावे अशी मागणी नगरपरिषदत काँग्रेसचे गटनेते,नगरसेवक विक्रम येरणे यांनी केली आहे.
गडचांदूर येथील माणिकगड(अल्ट्रॉटक), उप्परवाही येथेल मराठा सिमेंट वर्क्स (अंबुजा) या सिमेंट Ambuja कंपन्यांनी शासनाकडून परवानगी घेतांना ४०० ते ५०० वाहनांसाठी सुसज्ज असे पार्किंग यार्ड parking yard मंजूर नकाशात दाखविले आहे.परंतू अंबुजा सिमेंट येथे येणारे मोठमोठे ट्रक अंबुजा फाटा ते हरदोना गावापर्यंत आणि गडचांदूर माणिकगड कंपनीची वाहने येथील राजीव गांधी चौकापासून संताजी जगनाडे महाराज चौक ते ढुमने ले-आऊटपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभी असतात. नगरसेवक येरणे यांनी यापूर्वीही तक्रार केली होती. तेव्हां पोलीस विभागातर्फे माणिकगड सिमेंट कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती.काही दिवस चित्र बदलले मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे बनली आहे.
वास्तविक पाहता वाहनांच्या पार्किंगची संपूर्ण जबाबदारी स्वतः कंपन्यांची आहे. मात्र जड वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी करून सर्रासपणे नियमांचे उल्लंघन केले जात आहे.असे असताना दोन्ही कंपन्या नेहमी ट्रान्सपोर्ट कंपन्यांकडे बोट दाखवून या गंभीर विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात.जर वाहने रस्त्यावर उभी राहत असेल तर हा सदर सिमेंट कंपनी व ट्रान्सपोर्टर मधील कराराचा भंग आहे. सिमेंट कंपन्यांनी सदर ट्रान्सपोर्ट transport कंपन्यांवर कारवाई करायला हवी आणि जर हे ऐकत नसेल तर त्यांच्याकडून ट्रान्सपोर्टींगचे काम काढून इतरांना द्यायला पाहिजे.परंतु असे होताना दिसत नसल्याची खंत येरणे यांनी व्यक्त केली आहे.
सदर सिमेंट कंपन्या सोबतच परिसरातील दालमिया सिमेंट नारंडा व अल्ट्रॉटेक सिमेंट Ultratech cement आवारपूर येथे ये-जा करणारी मोठमोठी वाहने रस्त्यावर उभी न करता संबंधित कंपन्यांच्या पार्किंग यार्ड मध्येच उभी करण्याची सुचना करावी. अन्यथा कंपन्यांना दिलेली शासकीय परवानगी रद्द करावी अशी मागणी नगरसेवक,गटनेता विक्रम येरणे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, उपविभागीय परिवहन अधिकारी RTO Chandrapur चंद्रपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याविषयी आता सकारात्मक घडून नागरिकांना दिलासा मिळेल का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
